Nana Patole On Sanjay Raut Press Conferance : भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलताना दिला आहे. भाजप (BJP) विरोधात आंदोलन करणाऱ्या नाना पटोलेंना याबाबत विचारलं असता उद्याचा पेपर मी आज का फोडू? असं म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु, काही वेळातच मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 


संजय राऊतांनी उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. तसेच पुढे बोलताना भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असा इशाराही राऊतांनी दिला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, मला माहितीय ते कोण आहेत? पण जरा सस्पेन्स राहु देत. काही दिडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत."


संजय राऊत काय म्हणाले? 


आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा