Sanjay Raut Live : आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. 


संजय राऊत म्हणाले की, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील.  राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते,  असं संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं आहे.  


संजय राऊत म्हणाले की, उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार. शिवसेना हे महाराष्ट्राचे पॉवर केंद्र आहे. त्याच ठिकाणी बसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य आणि देशाला दिशा दिली. त्याच शिवसेना भवनात उद्या 4 वाजता पीसी होईल. मी असेलच. पण ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. आमदार, खासदार आणि मंत्री असतील. संपूर्ण देश उद्या ऐकेल. काय होतंय हे उद्या पाहा. आम्ही खूप सहन केलंय आता बर्बादही करणार, असं संजय राऊत म्हणाले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha




महत्त्वाच्या इतर बातम्या :