मुंबई : हुंड्यासाठी (Dowry) सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं. यासाठी कठोर नियम असले तरीही अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो. मुंबईतील नालासोपारा (Nalasopara) परिसरात हुंड्याच्या छळला कंटाळून एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्मत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने हाताच्या तळव्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे लिहून ठेवले होते. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तिच्या पती आणि सासर्‍याला अटक केली आहे.


नेमकं काय घडलं? 


मुंबईच्या सातरस्ता येथे राहणार्‍या संगिता कनोजिया 22 वर्ष या तरुणीचं मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये नालासोपाऱ्यात राहणाऱ्या  नितीशकुमार कनोजिया याच्या सोबत लग्न झाले होते. तिच्या लग्नात तिच्या आईवडिलांनी भरपूर हुंडा दिला होती. पण तरीही अधिक रकमेसाठी तिचा छळ करण्यात येत होता.  तिचा पती, सासरे, सासू आणि नणंद तिचा हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. तिला मारहाण देखील करत होते.  या छळाला कंटाळून तिने शनिवार (14 ऑक्टोबर) रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी दररोज माझा छळा केला जात होता, अपमानित केले जात होते असे तिने हाताच्या तळव्यावर आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले आहे.


पोलिसांची कारवाई


या प्रकरणी संगिताचे वडील मुन्नीलाल कनोजिया यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 'माझ्या मुलीला मारहाण केली जायची, तिला उपाशी ठेवले जात होते',असे तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी संगिताचा पती नितेशकुमार कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया, सासू आशा कनोजिया आणि नणंद माला कनोजिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला अटक केली आहे. 


भारतात हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. पण तरी आजही भारताच्या अनेक भागामध्ये हुंडा परंपरा अजूनही सुरु आहे. यामुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य देखील गमावलं आहे. तरीही या परंपरेला खतपाणी अनेकांकडून दिलं जात. संगितासारख्या कितीतरी मुलींनी आजपर्यंत हुंड्यासाठी आपलं आयुष्य गमावलं असल्याच्या घटना भारतात घडल्या आहेत. कायाद्यानुसार जरी यासाठी कठोर नियम असले तरीही यावर पूर्णपणे आळा घालण्यात आला नाही. 


हेही वाचा : 


Virar Crime : पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतरही 3 ठिकाणी केली चोरी, सराईत बॅग चोराला अखेर बेड्या