विरार : पोलिसांच्या तावडीतून पळालेला कुख्यात चोर मंगेश पार्टे याला अखेर आठ दिवसांनी पकडण्यात विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 च्या पथकाला (Virar Police) यश आले आहे. विशेष म्हणजे फरार असतानाही या आरोपीने 3 ठिकाणी चोरी केली होती. त्याला यापूर्वी सख्या भावाच्या हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.
मंगेश उर्फ मनिष यशवंत पार्टे (48) हा सराईत चोर आहे. ट्रेनमध्ये, मंदिरातून तसेच बाजारातून तो लोकांच्या बॅंग चोरण्यात माहीर (Virar Bag Thief) आहे. 3 ऑक्टोबर रोजी त्याला विरार पोलिसांनी (Virar Police) अंबेमाता मंदिरात बॅग चोरी करण्याच्या प्रकरणात अटक केली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी वसई विरार महापालिकेच्या चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात तपासणीसाठी आणले असताना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या हातातवर तुरी देऊन तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेते होते. अखेर विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून त्याला शनिवारी रात्री अटक केली होती.
पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतरही मंगेश उर्फ मनिष यशवंत पार्टे याने बोरीवली, दादर आणि पालघर जवळील केळवा या तीन ठिकाणी बॅग चोरीचे गुन्हे केले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो घरी न जाता रस्त्याच्या कडेला झोपायचा. नशेसाठी तो चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तहसीलदारांच्या नावाने सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं
तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचं आहे असं सांगत बुलढाण्यातील एका सराफ व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. चिखली तहसीलदारांच्या नावाने या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला गंडा घालत 12 ते 15 ग्रॅमच्या अंगठ्या आणि चेन लंपास केले होते. आता त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचे आहे, त्यांनी विश्वसनीय तसेच खात्रीचे दुकान म्हणून तुमच्या दुकानात पाठवले आहे, असं या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला सांगितलं. त्यानंतर सिनेस्टाईलने सगळ्या गोष्टी पार पाडत त्याने व्यापाऱ्याला फसवलं. संबंधित व्यापाऱ्याने तहसीलदारांशी संपर्क साधल्यानंतर त्याला सत्य परिस्थिती समजली आणि आपण फसल्याची जाणीव झाली. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
ही बातमी वाचा: