मुंबई : नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती एटीएसने दिली आहे. आज सेशन्स कोर्टातील सुनावणीवेळी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ही धक्कादायक माहिती दिली आहे.
अटकेत असलेल्यापैकी आरोपी शरद कळसकर (1) आणि सुधन्वा गोंधळेकर (3) यांच्याकडून हा कट रचला जात होता, असं एटीएसने कोर्टात सांगितलं. शिवाय यासाठी जालन्यातून अटक करण्यात आलेला श्रीकांत पांगारकर हा या स्फोटासाठी पैसे पुरवणार होता, असा दावाही एटीएसकडून करण्यात आला.
एटीएसने आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि वैभव राऊतला हजर केलं होतं. कोर्टात एटीएसने या आरोपींची आणखी नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या तपासात मोठी प्रगती झाली असून विविध राज्यात चौकशी सुरु आहे. त्या ठिकाणी चौकशीसाठी आरोपींना घेऊन जायचं आहे. आरोपींना शस्त्र बनवण्याचं प्रशिक्षण कुठे देण्यात आलं, याची माहिती मिळाली असल्याचंही एटीएसकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे.
दरम्यान या आरोपींच्या हिटलिस्टवरील देशभरातील सहा नावांची माहितीही एटीएसने कोर्टासमोर ठेवली आहे. ज्यात सीबीआयच्या नंदकुमार नायर यांच्या नावाचाही समावेश आहे.
नालासोपारा स्फोटकप्रकरण : आरोपींकडून सनबर्नमध्ये घातपाताचा कट : एटीएस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2018 04:51 PM (IST)
नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती एटीएसने दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -