मुंबई : नालासोपाऱ्यात मराठी दाम्पत्यावर दादागिरी करणारा रेल्वेचा टीसी निलंबन करण्यात आले आहे. रेल्वेत मराठी बोलणार नसल्याची लेखी हमी घेतल्याचा आरोप दाम्पत्याने केला होता. अखेर मराठी एकीकरण समितीच्या ठिय्याला यश मिळाले आहे. रितेश मौर्या असं हिंदी भाषिक टीसीचे नाव आहे. नालासोपारा रेल्वेस्थानाकात मराठी दाम्पत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही अशी लेखी पत्रक लिहून घेतल्याचा मराठी एकीकरण समितीने आरोप केला आहे.
रेल्वे प्रवासी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी सोबत हा सर्व प्रकार रविवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात घडला आहे. ही घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच नालासोपारा रेल्वेस्थानाकात सोमवारी मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता.
नेमके काय घडले?
टीसीने रेल्वेस्थानाकात पाटील दाम्पत्याला तिकीट तपासणीसाठी अडवले असता त्यांना टीसीची भाषा समजली नाही. त्यांना मराठी बोलण्यास सांगितले तर हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नही चलेगा अशी धमकी देत त्यांना आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवले. एवढच नाही तर पाटील दामपत्याकडून मराठी न बोलण्याचे लेखी लिहून घेतले होते. तर पाटील यांच्या पत्नीने काढलेला व्हिडीओ ही जबरदस्तीने डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनसेची आक्रमक भूमिका
मनमानी कारभार सुरू आहे. ठोस भूमिका घ्यायला कुणी तयार नाही. मराठी माणसांसाठी लढणारी आणि संघर्ष करणारी मनसे आहे. सत्तेत बसणारा पक्ष आहे त्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले नाही तर जनतेने त्यांना सत्तेतून उतरवायला हवं अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.
नेमके काय घडले?
नालासोपारा रेल्वे स्टेशनवर असलेल्या रितेश मौर्या या टीसीने पाटील दाम्पत्याला रेल्वे तिकीट दाखवण्यास सांगितले. त्यानंतर अमित पाटील प्रवाशाने आपल्याला हिंदी येत नसून मराठीत बोला असे टीसीला सांगितले मात्र मुजोर रितेश मौर्या या टिसीने मराठी (Marathi) बोलण्यास नकार दिला . प्रवाशासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पोलिसांनीही बोलावून अमित पाटील या प्रवाशाला धमकावण्यातही आले असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर प्रवाशाकडून यानंतर मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असं लिहून घेतलं.
हे ही वाचा :