Amit Thackeray Sada Sarvankar: माहीम विधानसभेच्या जागेवरून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सबंध ताणले गेले आहेत. काल शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे जवळपास निश्चित झाले असताना, आयत्या क्षणी त्यांनी तो मागे घेतला नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही? याची इन साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

Continues below advertisement

सदा सरवणकर हे काल राज ठाकरे यांना भेटायला गेले मात्र त्यांना राज ठाकरे भेटलेच नाही, सर्व प्रसार माध्यमांसमोर सदा सरवणकर हे माघारी फिरले, त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता, संघर्षाची वाट निवडली, मात्र त्याआधी काही गोष्टी घडल्या.  सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले होते, अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर सरवणकर हे तयारही झाले होते, मात्र त्याबदल्यात शिवसेनेकडून एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

शिवसेनेच्या प्रस्तावावर राज ठाकरेंनी देखील दर्शवली होती तयारी-

शिवसेना, माहीमची जागा सोडेल मात्र मनसेने शिवसेनेच्या विरोधातील 10 जागांवर उभे केलेले उमेदवार घ्यावे असा हा प्रस्ताव होता. या 10 जागा कोणत्या असतील हे देखील जवळपास निश्चित झाले होते. हा निरोप शिवतीर्थावर पोहचला, कोणत्या जागा असतील हे देखील सांगण्यात आले. त्यावर राज ठाकरे तयार देखील झाले होते, असे सूत्रांनी सांगितले, दुपारपर्यंत या घडामोडी पडद्याच्या मागे घडत होत्या, मात्र त्यापुढे काहीच हालचाल झाली नाही.

Continues below advertisement

ठरलं भांडुपचं, घोषणा माहीमची-

वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून राज ठाकरे यांना भेटायला सरवणकर आले, त्यांनी शिवतीर्थावर निरोप देखील पाठवला, मात्र सदा सरवणकर यांना भेट नाकारण्यात आली. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेली आणि शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष निश्चित झाला. त्याआधी जेव्हा एकमेकांच्या विरोधात उमेदवार द्यायचे की नाही हे, निश्चित होत होते, तेव्हा चर्चेत भांडुपची जागा शिवसेनेने सोडावी, अशी चर्चा सुरू होती, मात्र ऐनवेळी मनसेने माहीमच्या जागी अमित ठाकरे यांची घोषणा केली, त्यावेळी शिवसेनेला अंधारात ठेवले, असे शिवसेना सूत्रांनी सांगितले. 

...अन् सदा सरवणकरांनी निर्णय मागे घेतला-

एबीपी माझाच्याच कार्यक्रमात राज ठाकरे पक्ष आणि चिन्हावरून जे बोलले ते देखील शिवसेनेच्या नेत्यांना रुचले नाही, त्यामुळे सर्व ठरले असताना, सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अर्ज मागे घेण्याच्या आधी समोरासमोर बसून चर्चा व्हावी, असे मत शिवसेना नेत्यांचे होते मात्र सरवणकर यांना भेट नाकारल्याने शिवसेनेने अमित ठाकरेंच्या विरोधात लढणार नसल्याचा जो निर्णय घेतला होता तो मागे घेतला.

माहीममधील Inside Story, Video:

संबंधित बातमी:

सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला, राजकीय नाट्याचा फोकस स्वत:वर ठेवत मास्टरस्ट्रोक मारला