नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटापुढे संपूर्ण जगासह देशही हतबल झाला आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 6412 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच गंभीर व्हायरसमुळे 199 लोकांचा जीव घेतला आहे. दरम्यान, 503 लोक असेही आहेत, जे व्यवस्थित उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत आणि आपल्या घरी परतले आहेत.


देशात कोरोना बाधितांची एकूण संख्येपैकी 65 टक्के रूग्ण फक्त सहा राज्यांतील आहेत. देशभरातील या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळत आहे. या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि तेलंगणा याचां समावेश आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, कोरोनाचा प्रभाव दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये जास्त दिसून येत आहे. जाणून घेऊया या सहा राज्यांबाबत...


महाराष्ट्र


देशातील कोरोनाचा सर्वाधित प्रभाव महाराष्ट्र राज्यात असल्याचं पहायला मिळतं. आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या एक हजार पार गेली असून शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 1364 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 97 लोकांनी आपला जीव गमावला आहे.


तामिळनाडू


तामिळनाडूमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या राज्यात 834 वर पोहोचली आहे. तर आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : लॉकडाऊननंतर म्हणजे 14 एप्रिलनंतर रेल्वे आणि लोकल सुरू होणार का?



दिल्ली


देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये कोरोनाची बाधा झालेल्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कोरोना बाधितांची संख्या 720 असून 12 लोकांनी जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 25 लोकांना कोरोनामुक्त करण्यात यश आलं आहे.


राजस्थान


राजस्थानमध्ये 463 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 21 रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राजस्थानमध्ये 3 लोकांनी जीव गमावला आहे.


उत्तर प्रदेश


देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 410 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


तेलंगणा


तेलंगणामध्ये आतापर्यंत 442 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 35 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 7 लोकांनी जीव गमावला आहे.


6 राज्यांमध्ये 65 टक्के रूग्ण


महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 1364, तामिलनाडूमध्ये 834, दिल्लीमध्ये 720, राजस्थानमध्ये 463, उत्तर प्रदेशमध्ये 410 आणि तेलंगणामध्ये 442 रूग्ण समोर आले आहेत. या सर्वांची बेरीज 4208 होते, म्हणजेच, देशाच्या कोरोना बाधितांच्या एकूण आकड्यातील 65 टक्के आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | भारतात कोरोनाचा कहर! कोरोना बाधितांची संख्या 6412, तर 169 लोकांचा मृत्यू


देशात गेल्या 24 तासात 549 कोरोनाबाधित रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

coronavirus | मांजर पाळताय, खबरदारी घ्या ! मांजरामुळे होऊ शकतो 'कोरोना'