एक्स्प्लोर

बिहारमध्ये 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्याला कंदिवलीत अटक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा सामना रंगला होता. मात्र एका मुलाच्या अपहरण प्रकरणात मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या मदतीला धावून आले. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्या एकत्रित कामगिरीमुळे एक मुलगा सुखरुप त्यांच्या कुटुंबाला मिळाला आणि आरोपी गजाआड झाले.

मुंबई : बिहारमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबीयांकडे मुंबईवरुन 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली असून त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रियासुद्दीन अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासह बिहार पोलिसांनी बिहारमध्ये खान मुहंमद अन्सारी, अलाउद्दिन अन्सारी आणि मुस्लिम अन्सारी या आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी बिहारच्या चंपारण्यमधल्या धनहा इथे सात वर्षाच्या मुबारक अन्सारी या मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. ही खंडणी मागण्यासाठी आलेला फोन हा कांदिवली विभागातून आला होता. यामुळे बिहार पोलिसांनी कांदिवली पोलिसांना याची माहिती देऊन मदत मागितली होती. यानंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ आरोपी रियासुद्दीन अन्सारीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि बिहार पोलिसांच्या हवाली केले.

मुंबई पोलिसांच्या मदतीमुळे बिहार पोलिसांना उर्वरित आरोपी आणि त्या मुलाचाही छडा लागला. मुलाला शोधून सुखरुप त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हे कर्जबाजारी झाले होते. त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी ही गुन्हा केला होता.

याआधी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा सामना रंगला होता. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर सडकून टीका होती. मात्र एका मुलाच्या अपहरण प्रकरणात मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या मदतीला धावून आले. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्या एकत्रित कामगिरीमुळे एक मुलगा सुखरुप त्यांच्या कुटुंबाला मिळाला आणि आरोपी देखील गजाआड झाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय

व्हिडीओ

Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध
Myanmar Issue : म्यानमारमधून नेम, नेमका कुणाचा गेम? घुसखोरीचा हेतू काय? Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget