एक्स्प्लोर

मुंबईमधील नगरसेवकांच्या कामगिरीत घसरण, नागरिकांच्या समस्यांबाबत अनास्था, अहवालातून माहिती उघड

सभागृह, विविध समित्या तसेच प्रभाग समित्यांना नगरसेवकांना उपस्थित राहावे लागते. 2018 मध्ये नगरसेवकांची उपस्थिती 80.74 टक्के होती त्यात घसरण होऊन यावर्षी 77.56 टक्के इतकी उपस्थिती नोंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुंबई  : मुंबई महानगरपालिकेत नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांची सर्वच बाबतीत घसरण झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. नागरिकांच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करणे, सभांना उपस्थित राहणे आदी सर्वच बाबतीत नगरसेवकांची अनास्था दिसून आली आहे. मुंबईमधील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या 10 नगरसेवकांमध्ये 7 महिला नगरसेविका असून पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील नगरसेवकांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे. प्रजा फाऊंडेशन या एनजीओकडून महापालिकेतील नगरसेवकांचे सभागृहातील विचारविनिमय, त्यांचे कामकाज आणि त्यांच्या मतदार संघातील कामांबद्दलचे विश्लेषण यावर मुंबई प्रेस क्लब येथे नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या अहवालानुसार गेल्या वर्षी (2018) नगरसेवकांनी 2609 प्रश्न उपस्थित केले होते. यावर्षी त्यात घट होऊन 2571 इतकेच प्रश्न नगरसेवकांनी विचारले आहेत. मुंबई महानगरपालिकेत 227 नगरसेवक असून त्यापैकी 93 टक्के म्हणजेच 206 नगरसेवकांनी सभागृहात नागरिकांच्या तक्रारींबाबत विचारविनिमय न केल्याने 50 टक्के पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. सभागृह, विविध समित्या तसेच प्रभाग समित्यांना नगरसेवकांना उपस्थित राहावे लागते. 2018 मध्ये नगरसेवकांची उपस्थिती 80.74 टक्के होती त्यात घसरण होऊन यावर्षी 77.56 टक्के इतकी उपस्थिती नोंद असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये 7 महिला नगरसेविकांचा समावेश आहे. त्यात शिवसेनेच्या सुजाता पटेकर या 82.30 टक्के गुण मिळवून अव्वल स्थानी आहे. किशोरी पेडणेकर या 81.25 टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.  तर भाजपच्या सेजल देसाई या 77.33 टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे 5, भाजपाचे 3 तर काँग्रेसचे 2  नगरसेवक आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये 2014 साली 5  महिला नगरसेविका होत्या, 2018 साली 4 नगरसेविका तर यावर्षी 7 नगरसेविकांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. यांनी विचारला नाही एकही प्रश्न  दिनेश कुबल, गुलनाज कुरेशी, उपेंद्र सावंत, मनीषा रहाटे, आयेशा बानो खान, सुप्रिया मोरे या सहा नगरसेवकांनी एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित नाही. तर गुलनाज कुरेशी, मनीषा रहाटे आणि सुप्रिया मोरे या तीन नगरसेवकांनी निवडून आल्यापासून म्हणजेच मार्च 2017 ते मार्च 2019 या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही असे अहवालात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget