मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. अटल सेतूचे (Atal Setu) उद्घाटन केल्यानंतर आता दक्षिण मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोडचे (Coastal Road) उद्घाटन देखील होणार आहे. याची एक मार्गिका लवकरच खुली केली जाईल. या मार्गिकेवर सध्या काय काम सुरु आहे आणि त्यावर येण्या जाण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिलीये. 


दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सागरी किनारा मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात याची एक दक्षिण वहिनी मार्गिका खुली केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन केले जाईल अशी शक्यता आहे. त्याआधी एबीपी माझाने या मार्गावर प्रवास केला आणि त्यावर सुरु असलेल्या कामाचा सविस्तर आढावा देखील घेतला. 


कोस्टल रोडवरील कामाची स्थिती



  • प्रकल्पाची भौतिक प्रगती - 84.08 टक्के 

  • आर्थिक प्रगती - 79.84 टक्के 

  • बोगदा खणन - 100 टक्के 

  • पुनः प्रापण - 97 टक्के 

  • समुद्र भिंत - 84 टक्के 

  • आंतर बदल - 85.5 टक्के 

  • पूल - 83 टक्के 


 कोस्टल रोड विषयी महत्त्वपूर्ण माहिती


एकूण 10.58 किमीचा मार्ग असलेला हा कोस्टल रोड आहे. यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या 4 आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये 3 + 3 अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण 4.35 किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही 2.19 किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.19 किमी इतकी आहे. 


अशी आहे रचना


मुंबईच्या वरळी इथून कोस्टल रोडची सुरुवात होते.  मात्र याच वरळीतून कोस्टल रोडसाठी जास्त विरोध झाला होता. शेवटी इथल्या मच्छिमारांची मागणी लक्षात घेत कोस्टल रोडचे 2 पिलर मधील अंतर वाढवण्यात आले.सध्या हाच भाग उभारायचा बाकी आहे. फेब्रुवारीमध्ये ज्या ठिकाणापासून कोस्टल रोड सुरू करण्यात येणार आहे ते ठिकाण म्हणजे वरळी डेअरी असेल.या ठिकाणी सध्या शेवटचा कलेक्टर बनवायचे काम सुरू आहे. 


कोस्टल रोड ची सुरुवात झाल्यानंतर आठ किलोमीटरचा सलग असलेला प्रोमिनेड मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल.  याचा काही भाग सध्या बनवण्यात आला आहे. तसेच हा सर्वात मोठा प्रॉमिनेड असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जी दक्षिण वाहिनी मार्गी का खुली करण्यात येणार आहे त्या मार्गीकेवर भुलाबाई देसाई मार्गावरून आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी देखील आंतर बदल रस्ता बनवण्यात आला आहे. या कोस्टल रोडवर मध्यभागी असलेल्या  बोगद्यांसाठी भारतात पहिल्यांदाच सकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीम वापरण्यात आली आहे.या सिस्टीममुळे दोन किलोमीटरच्या बोगद्यात थंड पाणी, नवीन हवा सतत पुरवली जाईल. मरीन लाईन्स पासून थेट अमरसन्स पर्यंत दोन किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. यातील मरीन लाईन्स कडे जाणाऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. 


हेही वाचा : 


Coastal Road: मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई - वरळी कोस्टल रोडवर टोल लागणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा