मुंबई : मुंबई - वरळी कोस्टल रोड (Coastal Road) दरम्यान कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. रविवार 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका टनेलचं काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं देखील म्हटलं.
शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवर 250 रुपये टोल आकराण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयाविरोधात विरोधकांकडून टोलेबाजी करण्यात आली. परंतु आता मुंबई वरळी कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकाराचा टोल आकारणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान हा मार्ग लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
'या' दिवशी सुरु होणार कोस्टल रोड
कोस्टल रोड 31 जानेवारीला सुरु होईल . कोस्टल रोडच्या एका टनेलचं काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस 31 जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. तर दुसऱ्या टनेलचं काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे . दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल अशी प्रणाली करण्यात आली आहे.कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
कोस्टल रोडचा प्रकल्प नेमका कसा?
कसा आहे कोस्टल रोड आणि मुंबईला या कोस्टलरोडकडून काय मिळणार?
प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंतचा 10.58 किमीचा कोस्टल रोड तीन पॅकेजमध्ये विभागला आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट पूल - प्रियदर्शनी पार्क = 4.05 किमी
प्रियदर्रशनी पार्क ते बडोदा पॅलेस = 3.82 किमी
बडोदा पॅलेस ते बांद्रा वरळी सिलींक = 2.71 किमी
कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रात भराव टाकण्यात आले आहेत.समुद्राच्या लाटांचा प्रभाव रोखण्याकरता नैसर्गिक बेसॉल्ट खडकांची समुद्र भिंत तयार करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्हवर आहेत तसे कॉक्रिंटचे टेट्रापॉड वापरणे टाळले आहे. तसेच, मरिन ड्राईव्हसारखाच प्रियदर्शीनी पार्क ते वरळीपर्यंतचा भलामोठा नवा मानवनिर्मीत सागरी किनारा मुंबईकरांना मिळेल. तिथे मरिनड्राईव्ह सारखीच बसण्याची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू 12 जानेवारीपासून सेवेत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवर वाहनांना किती टोल असणार याची चर्चा सुरु होती. अखेर या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल असणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल असणार आहे.
हेही वाचा :
Coastal Road: कोस्टल कोड कधी सुरू होणार? खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली वेळ