मुंबई : मुंबईतील (Mumbai) सांताक्रुझ पश्चिममध्ये धीरज हेरिटेज या इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठी आग लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही आग लागली. धीरज हेरिटेज इमारतीच्या बेसमेंटमध्ये पार्क केलेल्या गांड्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पार्किंगमधून ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहचली. ही कमर्शियल इमारत असून या इमारतीमध्ये असलेल्या नागरिकांना सांताक्रुझ पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले आहे. तसेच या आगीमध्ये एका 45 वर्षीय महिलेचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आलीये. 


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या आगीमध्ये झाली नाही. परंतु पार्किंग केलेल्या गाड्या मात्र या आगीत जळून खाक झाल्या असल्याची माहिती समोर आलीये. 


नेमकं काय घडलं?


प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील पश्चिम भागामध्ये एस.वी. रोड असलेल्या धीरज हेरिटेज या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली. तसेच या आगीच्या परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली.  चार फायर इंजिन आणि एक रुग्णवाहिका, इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. 


मुंबईत आगीचं सत्र सुरुच


बुधवार 24 जानेवारी रोजी मुंबईत आगीच्या दोन घटना समोर आल्या होत्या. दरम्यान बुधवारी गोरेगावमधील एका इमारतीला आग लागली. तसेच गोरेगाव पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याची घटना देखील घडली होती. गोरेगाव पश्चिमेकडील एस वी रोड परिसरातील अनमोल टॉवर या  इमारतीला आग लागील होती. तसेच राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ देखील भीषण आग लागल्याची माहिती समोर आली होती. या परिसरात एका गोडाऊन लाग लागल्याचं माहिती समोर आलं होतं. गोडाऊनमधील डिझेल गोडाऊन आणि स्क्रॅप साहित्याला ही आग लागल्याची माहिती समोर आली होती. 


हेही वाचा : 


Pimpri Chinchwad Fire: पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग, होरपळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू