Mumbai Water Supply : लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर ऐन उन्हाळ्यात (Summer) मुंबईकरांना पाणीबाणीचा (Mumbai Water Issue) सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईत 10 टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू करण्याबाबत मुंबई महापालिकेच्या जलखात्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आयुक्तांकडून शिक्कामोर्त झाल्यास ऐन उन्हाळ्याच मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणी?
उन्हाळ्यात मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही. उन्हाळ्यात मुंबईतला पाणीपुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्याकडे विनंती केलेल्या राखीव पाणीसाठ्याबाबत अद्याप जलसंधारण खात्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे जलखात्याकडून इतर पर्यायी मार्गांचा शोध सुरु आहे.
10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव
मुंबई महापालिका प्रशासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवून 29 फेब्रुवारी पर्यंत उत्तर कळवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यास अद्याप सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही. आजच्या घडीला मुंबईत केवळ 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा मुंबईत ६ टक्के कमी पाणीसाठा आहे.