मुंबई : मुंबईतील उच्चशिक्षित आजींना पतीच्या निधनानंतर पोटच्या एकुलती एक मुलीने सांभाळ करण्यास नकार दिला. मुलीने घराबाहेर काढल्यानंतर आईला रस्त्यावर काढल्यानंतर जीवन कसे जगायचे असा प्रश्न पडला होता. आजींनी विलेपार्ले पोलिसांकडून मदत मागितली, त्यानंतर बेघर आजींना मदतीसाठी खाकी वर्दी धावून आली आहे.


मुंबईमध्ये विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या या 62 वर्षीय आजींनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी आपल्या पतीच्या निधनानंतर 15 वर्ष धुणीभांडी करून मुलीला शिक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र याच मुलींने कोरोना काळात आपल्या आईलाच घराबाहेर काढले. त्यानंतर त्यांनी 15 वर्षांपासून ज्यांच्याकडे काम केले त्यांच्याकडे मदतीसाठी गेल्या मात्र कोणीच मदत केली नाही. अखेर त्यांनी विलेपार्ले पोलीस स्टेशन गाठले. मात्र कोरोना काळ असल्यामुळे कोणीही वृद्धाश्रमात देखील घेण्यासाठी तयार नव्हते. त्यासाठी एक दीड महिना या आजीचा सांभाळ विलेपार्ले पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये केली. 


सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांच्याशी संपर्क साधून पुढील आयुष्याची सोय होण्यासाठी आजींची शिफारस केली. त्यानुसार लगेच कोरोना लसीकरणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल प्रमोद थोरात  यांनी आपल्या पत्नी वा मुलाला सोबत घेऊन गेले. जेणेकरून सामाजिक कार्यक्रमात आपला कुटुंबाचा हात असावा. कुसवली गाठात आजींना त्यांनी सहारा परिवारात दाखल केले. आजीला पोलिसांनी घर मिळवून दिल्याबद्दल आणि आजींना सन्मानपूर्वक सोडण्यात आल्यामुळे आजी आता खुश आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त धर्माधिकारी आणि विलेपार्ले पोलिसांचे आजींनी आभार मानले.


संबंधित बातम्या :


मुंबई पोलिसांचं 'शौर्य', आईबापानं सोडून दिलेल्या बालकाचं पालकत्व स्वीकारलं, दत्तक घेण्यासाठी विचारणा