मुंबई : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्यास आधीपासूनच शिवसैनिकांनी विरोध केला होता.
नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. त्यामुळे दूध, गोमुत्र आणि फुले टाकून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे. अप्पा पाटील आणि इतर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे.
जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा हल्लाबोल, म्हणाले उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत, तर फडणवीस म्हणाले...
शिवसेनेने शुद्धीकरणाची नौटंकी करु नये- आशिष शेलार
मुळात शुद्ध आणि अशुद्ध असा भेदभाव मानणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरे यांना मानणाऱ्या पक्षाची आहे, राज्याच्या संस्कृतीची ही विदारक स्थिती आहे. मुळात ती जागा कुणाची खासगी जागा नाही. मुंबई महानगरपालिकेची ती जागा आहे त्यामुळे तिथे कुणीही जाऊ शकतं. मुळात शुद्धीकरण करायचं तर ते शिवसेनेचंच करावं लागेल. कारण विश्वासघाताने सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमध्ये जायचं आणि आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींची शपथ घ्यायची, याचं शुद्धीकरण करावं लागेल. बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणाऱ्या शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. आपल्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन सत्तेत जायचं, त्या शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल. त्यामुळे शिवसेनेने शुद्धीकरणाची नौटंकी करु नये, असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
'शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात', महापौर किशोरी पेडणेकरांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईत सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा प्रारंभ झाला. नारायण राणेंनी आधी शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं.