एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
शिवसेनेच्या प्रचारासाठी वासुदेव, ओव्यांतून उमेदवाराचं गुणगान
![शिवसेनेच्या प्रचारासाठी वासुदेव, ओव्यांतून उमेदवाराचं गुणगान Mumbai Vasudev To Campaign For Shivsena In Ghatkopar शिवसेनेच्या प्रचारासाठी वासुदेव, ओव्यांतून उमेदवाराचं गुणगान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/12110545/Mumbai-Shivsena-Prachar-Vasudev.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला चांगलीच धार चढली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराचे हटके फंडे अवलंबायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने प्रचारासाठी थेट वासुदेवालाच साकडं घातलं आहे.
घाटकोपरमध्ये शिवसेनेकडून उमेदवार सुरेश पाटील महापालिका निवडणुकांच्या रिंगणात आहेत. सुरेश पाटील यांनी प्रचाराच्या आखाड्यात थेट वासुदेवालाच उतरवलं आहे. त्यासाठी खास बारामतीहून वासुदेवांना पाचारण करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे कोणतंही मानधन न घेता पारंपरिक वेशात वासूदेव प्रचार करण्यासाठी अवतरले आहेत. यावेळी वासुदेव ओव्यांमधून शिवसेनेच्या प्रचारासोबत मतदानाविषयी जनजागृतीही करताना दिसत आहेत.
दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion