मुंबई :  मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीच्या (Mumbai University Senate Election) मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत मुंबई विद्यापीठाने ( University Of Mumbai) चौकशी समिती गठीत केली होती. या चौकशी समितीच्या अहवालाने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelara) यांना मोठा धक्का बसला आहे. शेलार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीने दिला आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकी संदर्भातील मुंबई विद्यापीठाने गठित केलेल्या समितीचा अहवाल अखेर सादर करण्यात आला आहे. मतदार यादी मधील 756 मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा दिसत असली तरी त्यातील प्रत्येक मतदार हा वेगळा असल्याचे समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सादर केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचं मुंबई विद्यापीठाच्या अहवालातून समोर आले आहे. सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याचे काम सुरू करून लवकरच सुधारित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदार  याद्यांमध्ये त्रुटी असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर समितीने या सगळ्या प्रकरणातील अहवाल सादर केला आहे. या सगळ्या मतदार यादी संदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे समितीने नोंदवली आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या मतदारांची अंतिम संख्या 90 हजार 224 एवढी झाली आहे


दुबार नाव दिसत असलेले मतदार वेगवेगळे 


या अंतिम मतदारांच्या यादीत 756 एवढ्या मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा दिसून येत असली तरी ते वेगवेगळे मतदार आहेत. हे त्यांच्या पदवी प्रमाणपत्रावरील नाव, पदवीचा विषय, विद्याशाखा, निवासाचा पत्ता आणि पदवी प्राप्त होण्याचे वर्ष, अर्जावर नमूद केलेली माहिती यावरून खात्री केली असल्याचं समितीकडून सांगण्यात आले आहे. 


एकच नाव असलेल्या मतदारांमध्ये असा करणार फरक


मतदार यादीमध्ये कोणत्या मतदाराने मतदान केले आहे हे कळून यावे यासाठी मतदार यादीत सारखी नावे असलेल्या नावापुढे जो फरक आहे ते नमूद केला जाणार आहे. उदाहरणार्थ मतदाराचा फोटो वास्तव्याचे ठिकाण यातून हा फरक नमूद होईल, असं समितीकडून अहवालात सांगण्यात आल आहे. 


विद्यापीठाने पूर्वी 94,162  मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर केली होती.  आता त्यातील काही अर्ज बाद झाले आहेत आणि बाद झालेले काही अर्ज स्वीकारले गेले आहेत. त्यामुळे सध्या अंतिम 90 हजार 224 मतदारांची यादी तयार झाली आहे. असे मुंबई विद्यापीठाने नमूद केले आहे त्यामुळे या सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणे उचित ठरेल, असे समितीचे मत नोंदविले आहे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI