मुंबई: दिव्यांग असलेल्या मुंबईतील विराली मोदी यांच्या विवाह प्रकरणी (Virali Modi Marriage Case) विवाह अधिकारी अरुण घोडेकर यांचं अखेर निलंबन करण्यात आलं. विराली मोदी (Virali Modi) आणि क्षितिज नाईक (Kshitij Naik) 16 ऑक्टोबरला लग्नासाठी (Marriage) मुंबईच्या खार येथील विवाह कार्यालयात आले होते. हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने विरालीला तिथे बोलावण्यात आलं. दोन्ही पायाने अपंग असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं, तरीही सहीसाठी दुसऱ्या मजल्यावर येण्याचा हट्ट धरुन विवाह अधिकाऱ्याने नियमांचा भंग केला होता. या प्रकरणी आता विवाह अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.


नेमकं घडलं काय?


विराली मोदी यांना लग्न करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विवाह कार्यालयात जावं लागणार होतं. पण विवाह नोंदणी कार्यालयाच्या सरकारी इमारतीत लिफ्टची सुविधा देखील नव्हती. आता व्हिलचेअरवर बसून दुसऱ्या मजल्यावर जायचं कसं? हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळे विवाह अधिकाऱ्यांनी तळमजल्यावर येऊन सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली होती.


विरालींच्या कुटुंबीयांनी देखील विवाह अधिकाऱ्यांना कागदपत्रांवर सही घेण्यासाठी खाली येण्याची विनंती केली, पण त्यांनी ती नाकारली. विवाह नोंदणी करताना अंगठ्याचे ठसे आणि संगणकावर फोटो लागत असल्याचं विवाह अधिकाऱ्यांनी सांगितलं आणु दुसऱ्या मजल्यावर येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर विराली मोदी यांच्या नातेवाईकांनी कसं बसं व्हिलचेअरसह उचलून विरालीला दुसऱ्या मजल्यावर नेलं आणि त्यांचा विवाह संपन्न झाला.


कायद्याचा भंग केल्याने विवाह अधिकाऱ्याचं निलंबन


विवाह कायद्यानुसार, संबंधित अधिकाऱ्याला कार्यालयाच्या काही अंतरावर जाऊन विवाह लावण्याची तरतूद आहे. काही कारणास्तव अर्जदार कार्यालयात पोहोचू शकत नसल्यास विवाह अधिकारी त्यांना सहाय्य करू शकतो, पण खार विवाह कार्यालयातील विवाह अधिकाऱ्यांमी हे नियम पाळले नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, विवाह अधिकारी अरुण घोडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


दुसऱ्या मजल्यावर येण्याची सक्ती करणं भोवलं


विरालीला सर्वांनी व्हिलचेअर पकडून कार्यालयात नेलं, त्यावेळी त्या खूप घाबरल्या होत्या. कारण विवाह कार्यालयाची इमारत अगदी जुनी होती आणि पायऱ्या देखील उंच होत्या. पायऱ्यांच्या बाजूला धरण्यासाठी असलेल्या साखळ्या गंजलेल्या होत्या. त्यामुळे उचलून घेवून जाणाऱ्या एखाद्याचा पाय घसरेल किंवा एखाद्याचा पाय कुठे अडकेल, चुकून पडल्यास पाठीला लागेल, अशी भीती विरालींना वाटत होती. लग्नाच्या दिवशी जीव धोक्यात टाकून असा पराक्रम करायला लावल्याने आता विवाह अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.


हेही वाचा:


Kalyan Crime News : दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला जाब विचारला; भावावर तिघांचा प्राणघातक हल्ला