एक्स्प्लोर

राज ठाकरेंना पक्षात का घेत नाही? नाराज शिवसैनिकांचा सवाल

ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.

मुंबई : घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहचला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी विचारला आहे. बाहेरुन पक्षात आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याचं उघड दिसत आहे. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली. 'राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?' असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे. ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. 'शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असं म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले.

काय लिहिलंय पोस्टरवर?

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? इतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष पुढीलप्रमाणे मा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) - पूर्वी - मनसे मा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी - मनसे भाजप मा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) - पूर्वी - मनसे मा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) - पूर्वी - मनसे/राणे समर्थक मा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी - मनसे मा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) - पूर्वी - राष्ट्रवादी-मनसे-भाजप मा. शरद कोथरे  (शाखाप्रमुख) - पूर्वी - मनसे घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक 129 च्या बाहेर दोन दिवसांपूर्वी शिवसैनिक आपसांत भिडले होते. प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची शाखाप्रमुख पदावर निवड झाली.

भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा!

शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज होते. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांच्या गटांमध्ये भांडण झालं. आता होर्डिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे

Embed widget