मुंबई : मुंबईतील शिवडी परिसरात झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी ट्रकवर धडकल्याने मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.


दुचाकीस्वार वडाळ्याहून सीएसटीच्या दिशेने निघाले होते. एका क्रॉसिंगवर ट्रकने अचानक घेतलेल्या यू टर्नमुळे या दुचाकीस्वारांना जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला, तर दोघेही दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लीनर घटनास्थळाहून फरार झाले आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून दोघांचा शोध सुरु आहे.