Mumbai Traffic Police: बारावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी अल्पिता वनगे ही सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. पण चुकून ती दुसऱ्या बसमध्ये बसली आणि हे लक्षात येताच ती मध्येच खाली उतरली. आता करायचे काय काहीच कळत नसल्याने ती रस्त्याच्या कडेला रडत उभी राहिली. तेवढ्यात वाहतूक कॉन्स्टेबल सुरेश पवार हे तिच्या मदतीला धावून आले. त्यामुळे अल्पिताला तिचा बारावीचा पेपर देता आला. 


चुनाभट्टी येथे राहणारी अल्पिता वनगे हिचा मंगळवारी बारावीचा हिंदीचा शेवटचा पेपर होता. तिला चेंबूर नाका परिसरातील महात्मा फुले कॉलेज हे परिक्षा केंद्र आले होते. नेहमीप्रमाणे ती पेपर करिता घराबाहेर पडली पण दुसऱ्याच बसमध्ये बसली. नेहमीच्या मार्गाने बस जात नसल्याचे लक्षात येताच तिने आईला फोन करून सांगितले. आईने बसमधून उतरण्यास सांगताच अल्पिता सुमन नगर जंक्शन येथे उतरली.


याबाबत बोलताना पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पवार म्हणाले आहेत की, काल आम्ही सुमन नगर जंक्शन सिग्नलला ड्युटीवर करत होतो. त्यावेळेस ही विद्यार्थिनी तिथे आपल्याला रडताना दिसली. मी तिची विचारपूस केली, की बेटा का रडतेस. तिने सांगितलं की, आज माझा बारावीचा शेवटचा पेपर असून मी मी चुकीच्या बसमध्ये चढल्याने मला वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचता येणार नाही. यानंतर मी लगेच हेल्मेट घालत मोटारसायकल काढत तिला वेळेत परीक्षा केंद्रावर पोहिचवलं. तिचा पेपर बुडाला असता तर आयुष्यचे नुकसान झाले असते, असं ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे. दरम्यान, अल्पिताचे वडील अविनाश वनगे आणि तिने पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.    


संबंधित बातम्या :


Mumbai News : दारुच्या दुकानांवर महापुरुष आणि गड-किल्ल्यांची नावे नको, मुंबई महानगपालिकेचे आदेश


Mumbai School : मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक आता मराठीत झळकणार! मुंबई महानगरपालिकेने दिल्या सूचना


Mumbai University : महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीत झळकणार! मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सूचना