Mumbai University : मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये मराठीमध्ये नामफलक असावेत.  शिवाय मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने निर्णय घ्यावा, अशा प्रकारची मागणी युवा सेनेकडून अधिसभेत करण्यात आली होती. अखेर या मागणीला प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी विशेष परिपत्रक काढले आहे. आता मुंबईतील विद्यापीठांतर्गत येणारे सर्व कॉलेजेस मध्ये मराठीमध्ये नाम फलक असतील अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले आहेत


महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीत झळकणार 

मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय अशासकीय अशा सर्व प्रकारच्या पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाचे नाम फलक मराठीत असावेत, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. मागील महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत मराठी भाषेला अनुसरून मुंबई विद्यापीठ व त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मराठीला अधिकाधिक स्थान मिळावं, अधिकाधिक मराठी भाषेचा वापर व्हावा. यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, अशा प्रकारचा स्थगन प्रस्ताव युवासेनेच्या वतीने शितल देवरुखकर शेठ यांनी मांडला होता. त्यानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय तातडीने घ्यावा, म्हणून निवेदन सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले होते. त्यानंतर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद विद्यापीठाने दिला असून त्या संदर्भात सूचना तातडीने विद्यापीठाकडून करण्यात आले आहेत.

 


काय आहेत मुंबई विद्यापीठाच्या सूचना?

 

-सहज दिसेल अशा पद्धतीने महाविद्यालयाचे नाव दर्शनी भागात मराठीत असावेत

 

-महाविद्यालयाची माहिती पुस्तक व प्रवेश अर्ज मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावेत

 

-महाविद्यालयांच्या पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा

 

-महाविद्यालयांमध्ये सूचना मराठीतून लिहिण्याला प्राधान्य द्यावे

 

-कार्यशाळांमध्ये प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा

 

-मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात यावा,

 

-विविध चर्चासत्रे स्पर्धा यांचे आयोजन करण्यात यावे

 

-त्यामुळे आता या सूचनांचे पालन मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 800 पेक्षा अधिक महाविद्यालयांना करायचा आहे.

 

-मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी विशेष मोहीम महाविद्यालयांनी हाती घ्यायची आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या




 

 


 

 

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI