मुंबई :  मुंबईतील विद्यापीठ, शाळा, दुकाने  यांचे नामफलक नामफलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. एवढेच नव्हे तर ज्या दुकानांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा दुकानांवर नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत, असे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहे.  मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईतील दुकानांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी अर्थात सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्या भाषेत देखील नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे. एवढेच नव्हे तर ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा दुकानांवर नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेने आदेश दिले आहे.  


मुंबईतील  प्रत्येक दुकाने नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. परंतु, अशा  दुकानांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षर हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.  तसेच, ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा  दुकानांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. 


संबंधित बातम्या :


Mumbai School : मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक आता मराठीत झळकणार! मुंबई महानगरपालिकेने दिल्या सूचना


Mumbai University : महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीत झळकणार! मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सूचना


सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय