मुंबई : दादर येथील सुविधा फॅशन स्टोअरचे संचालक कल्पेश शांतीलाल मारू (Suvidha Director Kalpesh Maru) यांचा मृत्यू झालाय. विष पिऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कल्पेश यांचा मृतदेह गुरुवारी वसई पोलिसांना आढळून आला. मृतदेहाशेजारी एक बाटली आणि गोळ्यांची रिकामी पाकिटे सापडल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील मांडवी पोलिसांना गुरुवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फार्महाऊसचे मालक राजू साळवी यांनी फोन करून एक व्यक्ती त्यांच्या गेटजवळ पडला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. पोलिसांनी माहिती काढली असता तो मृतदेह दादर पश्चिम येथील डीएल वैद्य रोड येथील रहिवासी कल्पेश शांतीलाल मारू यांचा असल्याचे समजले.  


कल्पेश हे सोमवारपासून बेपत्ता होते. गुरूवारी त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. दरम्यान, यापूर्वीही कल्पेश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


कल्पेश हे दादर येथील प्रसिध्द सुविधा शोरुमचे मालक तसेच प्रसिध्द कापड व्यावसायिक शांतीलाल मारु यांचे पुत्र होते. त्यांचा मृतदेह 18 ऑगस्ट रोजी विरारच्या शिरसाड फाटा येथील वर्तक फॉर्म हाउसच्या बाजूला मिळाला.  फॉर्म हाउसच्या मालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कल्पेश यांना तत्काळ शिरसाडच्या ओमसाई हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केलं. कल्पेश हे विषारी द्रव्य पियाल्याचे  डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांना त्याच्यांजवळ आयफोन, आधार कार्ड, पॅन कार्ड मिळाले. त्यावरून कल्पेश यांची ओळख पटली. 


दरम्यान, कल्पेश मारू हे विष का प्यायाले याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मात्र, प्राथमिक माहितीद्वारे कल्पेश यांनी यापूर्वी देखील तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आजारी होते, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांना पाकिस्तानातून धमकीचा मेसेज, विरारमधून एक संशयित ताब्यात, पोलिसांकडून चौकशी सुरु 


मुंबई पोलीस कंट्रोल रुमला धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नंबरशी संपर्क; लाहोरचा माणूस म्हणाला, मीच परेशान झालोय!