Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या whatsapp वर धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. याप्रकरणाचा तपास वेगानं सुरु करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं धमकीचा मेसेज आलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता हा मेसेज पाकिस्तानमधून असल्याचं समोर आलं आहे. धमकीचा मेसेज आलेला नंबर वापरणाऱ्या व्यक्तीचं नाव इम्तियाज असे आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे  त्याला अशा कोणत्याही संदेशाची माहिती नाही. कारण तो एक सामान्य फोन वापरत आहे ज्यामध्ये कोणतेही व्हॉट्सअॅप नाही. पण भारतातून कॉल येऊ लागल्याने तो स्वत: डिस्टर्ब असल्याचे त्यानं एबीपीशी बोलताना सांगितलं.  


सुरक्षा यंत्रणेनेही केला संपर्क - 
पाकिस्तानमधून ज्या क्रमांकावरुन धमकीचा मेसेज आला होता, त्याला सुरक्षा एजन्सीनेही संपर्क केला. सुरक्षा एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इम्तियाज यांच्या क्रमांकावरुन धमकीचा मेसेज आला आहे. इम्तियाज पाकिस्तानातील लाहोरचा आहे. पण इम्तियाजला या मेसेजसंदर्भात कोणताही माहिती नाही. भारतामधून येणाऱ्या फोनमुळे तो परेशान झालाय. त्यानं सुरक्षा एजन्सीला सांगितलं की तो पाकिस्तानमध्ये सरकारी कर्मचारी असून पेशानं माळी आहे. इम्तियाजने भारतीय सुरक्षा एजन्सीला बोलताना सांगितलं की, 'तो सामान्य कीपॅड असणारा फोन वापरत आहे ज्यामध्ये कोणतेही व्हॉट्सअॅप नाही. तसेच आपण मेसेज केलेला नाही. '


मेसेज नेमका केला कुणी?
भारतीय सुरक्षा यंत्रणाशी बोलताना इम्तियाजने त्याचा फोन काही दिवसांपूर्वी हरवल्याचा दावा केला आहे. तसेच त्याचा चुकीचा कुणी वापर केला असू शकतो, असेही त्यानं सांगितलं.


पाकिस्तानमध्ये करणार तक्रार - 
याबाबात लवकरच पाकिस्तानमधील पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही इम्तियाजने सांगितलं. हरवलेल्या फोनचा चुकीचा वापर झाल्याचं त्यानं सांगितलं.  


भारत-पाकिस्तानमध्ये प्रेमाचं नातं -
भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रेमाचं नातं आहे. अशात मी कधीच असं काम करु शकत नाही, असे इम्तियाजने भारतीय सुरक्षा यंत्रणेला सांगितलं.  


धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटलेय?
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या whatsapp वर धमकीचा मेसेज आलाय. 26/11 सारखा मुंबईत हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे. 


आणखी वाचा : 
Mumbai Police Threatened : मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज; मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन


Mumbai Police Threatened : मुंबईत पुन्हा 26/11 ची पुनरावृत्ती? मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज