Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सअपवर धमकीचा मेसेज आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धमकीचा मेसेज आला असला तरी कोणीही घाबरू नये सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटले आहे. याबरोबरच आम्ही सागर कवच हा प्रोग्रॅम संपूर्ण समुद्रात सुरू केला आहे. सध्या सुरू असलेल्या सणांमुळे आम्ही दोन दिवस आधीच बंदोबस्त वाढवला आहे, अशी माहिती फणसळकर यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सअपवर आलेल्या मेसेजमधून मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या मेसेजमुळे मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. आगामी हंगामासाठीही आम्ही सतर्क आहोत, सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांना सतर्क केले आहे. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत दक्ष आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत, अशी माहिती आयुक्त फणसळकर यांनी दिली आहे.
दरम्यान, गुरूवारी रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळ्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या धमकीच्या मेसेजमुळे मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
श्रीवर्धन येथे आढळलेल्या या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कसा असतो सागर कवच प्रोग्रॅम?
समुद्र किणारी आणि संपूर्ण समुद्रात पेट्रोलिंग केली जाते. समुद्रात करण्यात येणाऱ्या पेट्रोलिंगसाठी नेव्ही आणि कोष्टगार्डची मदत घेतली जाते. त्यालाच समुद्र कवच म्हणतात. असाच समुद्र कवच प्रोग्राम आता राबवण्यात येणार आहे.
सागरी सुरक्षेसाठी मुंबईत तीन पोलीस ठाणे कार्यरत
1) यलोगेट - कार्यकारी
2) सागरी 1- अकार्यकारी
3) सागरी 2 - अकार्यकारी
सागरी एक आणि सागरी दोन हे फक्त सागरी भागात गस्त घालण्याचे काम करतात. तर यलोगेट पोलीस ठाण्याला गस्ती बरोबर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. दहिसर पासून वांद्रे पर्यंत सागरी दोन तर वांद्रे ते कुलाबा दरम्यान सागरी एक पोलीस गस्त घालतात. गेट वे आँफ इंडिया ते वाशी खाडीपर्यंत यलोगेट पोलिसांची गस्त राहते. परंतू दिव-दमण पासून गोवा पर्यंत समुद्रात 12 नाँटिकलच्या पुढे कुठलाही गुन्हा घडल्यास तो यलोगेट पोलीस ठाण्यात दाखल होतो.
समुद्रात 12 नाँटिकलच्या आत कुठलाही गुन्हा घडल्यास त्यांची नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद होते. समुद्रात पाच नाँटिकलपर्यंत मुंबई पोलिसांची गस्त असते. 5 ते 12 नाँटिकल दरम्यान तटरक्षक दल तर 12 नाँटिकलच्या पुढे नौदलाची गस्त राहते.
महत्वाच्या बातम्या
Mumbai Police Threatened : मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज; मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन
रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा, एके-47 सह बोटीवर 2 चॉपरही आढळले