Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या whatsapp वर धमकीचा मेसेज आला आहे. 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे.  धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झालं असून तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचं आवाहन केलेय. 


मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. ते म्हणाले की, 'मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे.  मुंबई गुन्हे शाखा याबाबात सखोल कारवाई करत आहे. तसेच यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. '


काल पावणे बाराच्या सुमारास मुंबई ट्रॅफिक whatsapp वर धमकीचे मेसेज आले. मोबाईल क्रमांक आंतरराष्ट्रीय आहे, त्यामुळे आम्ही ते गांभीर्याने घेत आहोत. या संबंधित वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच याचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात येणार आहे. मुंबई क्राइम ब्रँच याबाबत  सखोल कारवाई करत आहे, असेही आयुक्त म्हणाले.  


धमकीचा मेसेज आलेल्या नंबरचा तपास करण्यात येत आहे.  या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुंबई पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे. मुंबई गुन्हे शाखेची तीन पथके तपास करत आहेत. याबाबत आम्ही महाराष्ट्र एटीएसला माहिती दिली आहे. इतर यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाही. मुंबई पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आयुक्तांनी केले. सुरक्षेसाठी सागर कवच प्रोग्रॅम संपूर्ण समुद्रात सुरू केल्याचेही आयुक्तांनी सांगितलं.  सध्या सुरू असलेल्या सणाच्या आधी आम्ही दोन दिवस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस हाय अलर्टवर असल्याचेही आयुक्तांनी सांगितलं. 


मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर काय म्हणाले?



धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटलेय?
मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.