मुंबई : मुंबईतील लोकलच्या प्रवास लवकरच महागण्याची चिन्हं आहेत. लोकलची मागणी आणि त्याप्रमाणातील पुरवठ्यावर लोकलचं प्रवासभाडं बदलणार आहे. त्यामुऴे गर्दीच्या काळात प्रवास करणाऱ्य़ा मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रेल्वेनं नेमलेल्या समितीनं हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात गर्दीच्या वेळी जास्त तिकिट मोजावं लागेल, तर दुपारी किंवा कमी गर्दीच्या वेळी लोकलचं प्रवासभाडं तुलनेनं कमी असेल. रेल्वे प्रवासाचं भाडं ठरवण्यासाठी ‘मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नस’ योजनेच्या माध्यमातून सुरेश प्रभूंनी एक समिती स्थापन केली होती. ही समिती देशातील उपनगरीय आणि कमी अंतराच्या रेल्वे सेवांचे भाडे ठरविण्याच्या सध्याच्या व्यवस्थेवर संशोधन करते.
दरम्यान या दरवाढीचा अहवाल पुढच्या महिन्यापर्यंत समिती रेल्वे मंत्रालयाला सोपवणार आहे. उपनगरीय रेल्वेचं प्रवासभाडं स्पर्धात्मक असावं असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. डायरेक्टर जनरल पर्सोनलच्या नेतृत्वातील समिती रेल्वेच्या भाडय़ाची रचना लवचिक बनविण्यासाठी रेल्वेचे जनरल मॅनेजर, विविध झोन आणि डिव्हिजन रेल्वे मॅनेजर्सना जास्तीचे अधिकार प्रदान करणार आहे.
मुंबईतील लोकलप्रवास लवकरच महागणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2017 02:57 PM (IST)
लोकलची मागणी आणि त्याप्रमाणातील पुरवठ्यावर लोकलचं प्रवासभाडं बदलणार आहे. त्यामुऴे गर्दीच्या काळात प्रवास करणाऱ्य़ा मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -