ठाणे : ठाण्यात एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. श्रद्धा लाड असं या महिला डॉक्टरचं नाव असून त्या पेशानं मानसोपचारतज्ज्ञ आहेत.
ठाण्यात नौपाडा परिसरातील टेकडी बंगाल येते राहात असलेल्या या महिला डॉक्टरनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान काल संध्याकाळी त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते, आणि मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे.
श्रद्धा लाड यांना 2 मुलं आहेत. गेली 12 वर्ष त्या नर्सरी स्कुल चालवत होत्या. मात्र लाड यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2017 02:13 PM (IST)
ठाण्यात एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. श्रद्धा लाड असं या महिला डॉक्टरचं नाव असून त्या पेशानं मानसोपचारतज्ज्ञ आहेत.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -