मुंबई: एका विकृताने  इमारतीजवळ फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या ओठाचा करकचून चावा घेतला. धक्कादायक म्हणजे या घटनेमुळे संबंधित महिलेच्या ओठाचा तुकडाच पडला.

शीवमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

पीडित महिलेच्या ओठांवर हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र हा नराधम फरार झाला असून सायन पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत..

पीडित महिला ही धुळवडीच्या दिवशी इमारतीच्या खाली फेरफटका मारत होती. त्यावेळी या विकृत तरुणानं महिलेचे चुंबन घेण्यास सुरूवात केली आणि ओठांचा जोरदार चावा घेतला. या चाव्यामुळे ओठांचा तुकडा खाली पडला आणि महिला बेशुद्ध झाली. हिंदूजा रुग्णालयात उपचारानंतर तिनं ही माहिती दिली.

https://www.youtube.com/edit?o=U&video_id=C0YIn6twp98