एक्स्प्लोर

प. रे.वर विशेष रात्रकालीन ब्लॉक, तर हार्बर आणि मध्यवरही मेगाब्लॉक

एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईत एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील कामासाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तर दुसरीकडे दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य मार्गावरील ठाणे ते कल्याण (धिम्या मार्गावर) आणि हार्बर मार्गावरील चुन्नाभट्टी-सीएसएमटी-वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी  पश्चिम रेल्वेकडून विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.  4 आणि 5 मार्च दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल. आज, म्हणजे रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी पहाटे सहा वाजेपर्यंत हा ब्लॉक चालेल. या विशेष ब्लॉकमुळे चर्चगेट-मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकादरम्यान धावणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल महालक्ष्मी, एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तर लोअर परळ आणि माहिम स्थानकांवर लोकल फेऱ्यांना दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. या विशेष मेगाब्लॉकमुळे वांद्रे ते चर्चगेट स्थानकादरम्यानच्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील. दुसरीकडे मध्य आणि हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावरील ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 11 ते 4 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मुलुंड ते कल्याण स्थानकादरम्यानच्या सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील सर्व लोकल 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावरील चुन्नाभट्टी-वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सदरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सहुन पनवेल, बेलापूर आणि वाशी स्थानकासाठी सुटणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सीएसएमटीवरुन अंधेरी आणि वांद्र्याकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही या मेगाब्लॉक काळात बंद असणार आहेत. दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी कुर्ला स्थानकातून पनवेल, वाशी आणि बेलापूरसाठी विशेष लोकल सोडण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget