एक्स्प्लोर

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, अनेक एक्स्प्रेसही रद्द

मध्य रेल्वेसोबत हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही रविवारी सहा तास बंद राहणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परळ स्थानकाच्या नव्या फलाटासाठी मध्य रेल्वेवर आठ तासांचा, तर हार्बर मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री 12 वाजून 45 मिनिटे ते सहा वाजून 25 मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉकचा फटका मेल-एक्स्प्रेसलाही बसेल. शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहे. परळ स्थानकात नव्या फलाटांसाठी रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटे ते पाच वाजून 30 मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेऱ्या सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान 11 वाजून 34 मिनिटे ते दुपारी चार वाजून 47 मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. चुनाभट्टी /वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक 11 वाजून 10 मिनिटे ते चार वाजून 10 मिनिटांपर्यंत बंद असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल, कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट, पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी दहा वाजून 35 मिनिटे ते दुपारी तीन वाजून 35 मिनिटांपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या काळात धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. कोणत्या डाऊन लोकल रद्द? शनिवार सीएसएमटी-कल्याण रात्री 9 वाजून 54 मिनिटे सीएसएमटी-अंबरनाथ रात्री 11 वाजून 52 मिनिटे रविवार विद्याविहार-टिटवाळा पहाटे 5 वाजून 12 मिनिटे सीएसएमटी-अंबरनाथ पहाटे 5 वाजून 40 मिनिटे विद्याविहार-कल्याण पहाटे 6 वाजून 37 मिनिटे कोणत्या अप लोकल रद्द? शनिवार कल्याण-सीएसएमटी रात्री 11 वाजून 5 मिनिटे रविवार कल्याण-सीएसएमटी पहाटे 4 वाजून 41 मिनिटे , 6 वाजून 4 मिनिटे, 6 वाजून 15 मिनिटे अंबरनाथ-सीएसएमटी पहाटे 3 वाजून 45 मिनिटे, 4 वाजून 11 मिनिटे टिटवाळा-सीएसएमटी पहाटे 4 वाजून 1 मिनिटे कोणत्या एक्स्प्रेस रद्द? शनिवार - पुण्याहून मुंबईकडे येणारी इंद्रायणी एक्स्प्रेस शनिवार - भुसावळहून मुंबईकडे येणारी भुसावळ पॅसेंजर रविवार - मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस रविवार - मुंबईहून भुसावळकडे जाणारी भुसावळ पॅसेंजर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget