MP Sanjay Raut Bail Hearing : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी होणार असून आज न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे. दरम्यान, तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं (ED) केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट  निर्णय देणार आहे. 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आपलं लेखी उत्तर न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयानं जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल देणार आहे. 


मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात येणार आहे. 


संजय राऊतांवर आरोप काय? 


ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून 


अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sanjay Raut : संजय राऊत यांनी तुरुंगात कशी साजरी केली दिवाळी?