एक्स्प्लोर

प्रेयसीच्या आत्महत्येला जबाबदार ठरवलेल्या पोलिसपुत्राचा गळफास

'तरुणाच्या घरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आम्ही अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला आहे' अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई : मुंबईत हेड कॉन्स्टेबलच्या 25 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकावर कॉन्स्टेबल असलेल्या प्रेयसीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरुणाच्या गर्लफ्रेण्डने नोव्हेंबर महिन्यात आपलं आयुष्य संपवलं होतं. रविवारी सकाळी राहत्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मुंबईतल्या परेल भागातील पोलिस हेडकॉर्टर्समध्ये राहत होता. एका खाजगी कंपनीत तो नोकरी करत होता. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. 'तरुणाच्या घरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आम्ही अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला आहे' अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. घटनेच्या वेळी तरुणाशिवाय कोणीही घरी नव्हतं. मुलाने बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे त्याच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. 28 नोव्हेंबर रोजी तरुणाच्या 22 वर्षीय गर्लफ्रेण्डने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे तरुण राहत असलेल्या पोलिस हेडकॉर्टर्समध्येच मयत कॉन्स्टेबल तरुणीही राहत होती. 2014 पासून ती पोलिस दलात कार्यरत होती. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र युवकाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुणीच्या बहिणीने संबंधित युवकाविरोधात भोईवाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
Mumbai Crime News: 'मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार'; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
'मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार'; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Ritu Tawde: रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Embed widget