मुंबई : अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी अटकेच्या भितीपोटी न्यायालायात आलेल्या अभिनेत्री गेहना वाशिष्टला ( Gehana vashishth ) दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे.


पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटक होऊ नये, म्हणून गेहनानं अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोनाली अग्रवाल यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मुख्य आरोपींनी पीडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सदर आरोप आणि एकंदरीत परिस्थितीचा विचार करता याचिकाकर्त्यांना दिलासा देता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं गेहना वाशिष्टला दिलासा देण्यास नकार देत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.


या प्रकरणातील दुसरी आरोपी आणि मॉडेल शर्लिन चोप्राचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नुकताच फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याचा आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना अश्‍लील चित्रपटांची निर्मिती आणि अॅप्सद्वारे प्रकाशित करण्याच्या कथित प्रकरणात अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


Gehana Vasisth: ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्या प्रकरणी 'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ अटकेत


कोण आहे गहना वशिष्ठ?


गहना वशिष्ठ ही बालाजी प्रोडक्शनची अॅडल्ट सीरिज 'गंदी बात' ची अभिनेत्री आहे. तीने यापूर्वी मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे. गहना वशिष्ठने आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.


इतर संबंधित बातम्या


पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना किती काळ दोषी ठरवायचे? राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ रिचा चढ्ढा


Pornography Case : पती राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पाची सविस्तर प्रतिक्रिया; म्हणाली...