Mumbai Corona Update : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता कमी होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येचा आलेख कमी होत आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत 1858 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत मुंबईत 1656 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या एकूण 1858 रग्णापैकी फक्त 233 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत.  

राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 364सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका झाला आहे. 

मागील काही दिवसांतील मुंबईची आकडेवारी

दिनांक मुंबईतील रुग्णसंख्या
10 जानेवारी 13,648
11 जानेवारी 11,647
12 जानेवारी 16,420
13 जानेवारी 13, 702
14 जानेवारी 11, 317
15 जानेवारी 10, 661
16 जानेवारी 7, 895
17 जानेवारी 5, 956
18 जानेवारी 6, 149
19 जानेवारी 6, 032
20 जानेवारी 5,708
21 जानेवारी 5,008
22 जानेवारी 3,568
23 जानेवारी 2250 
24 जानेवारी 1857
25 जानेवारी 1815

सध्या मुंबईतील 27 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1858 रुग्णांपैकी 233 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 830बेड्सपैकी केवळ 3 हजार 118 बेड वापरात आहेत.