मुंबई :   महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची घडली आहे. मुंबई जवळच्या मिरारोड येथे राहणाऱ्या पृथ्वी पाटील हिने महाराष्ट्रचा झेंडा दिल्लीत जाऊन फडकवला आहे. महाराष्ट्राचे प्रतिनीधित्व करत देशभरातून आलेल्या एनसीसीच्या एअरविंगमधून तिने मुलीच्या कॅडेटमधून देशातून प्रथम क्रमांक पटकवला आहे.  28 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या या कन्येचं सन्मान होणार आहे.


महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र एअर विंगचे कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिने एअर विंग राष्ट्रीय छात्र सेनेच्या, म्हणजेच एनसीसीच्या  एअर विंग कॅडेट्समध्ये मुलीमध्ये देशभरातून सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून मान मिळवला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, पृथ्वी ही  19 वर्षांची आहे. ती सध्या मुंबईच्या  जयहिंद कॉलेजमधून बीएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती मीरा रोडच्या न्यू गोकूल धाम या सोसायटीत राहते. तिचे वडिल मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेवून, आता ते इतर मुलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि सैनिक स्कुलचे प्रशिक्षण देत आहेत. तर पृथ्वीची आजी कमल पाटील या देखील मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून 32 वर्ष काम केलं आहे. त्यामुळे पृथ्वीच्या घरात नेहमी देशसेवाचा माहौल राहीला होता. त्यातून तिने एनसीसीचं प्रक्षिशण घेतलं आणि आज तिने घवघवीत यश मिळवलं आहे.


नॅशनल कॅडर संचनालय 2022 मध्ये महाराष्ट्राची राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट, वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटीलला राष्ट्रीय पातळीवरच्या बेस्ट कॅडेटचा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते तिला पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे.  28 जानेवारीला तिचा सन्मान होणार असल्याने तिचे सर्व शेजारी, गुरुवर्य, आणि घरातील सर्वजण आनंदी आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: