Heavy Rain in Mumbai & Thane: मुंबई, ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain Update: अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड,  कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे.

Continues below advertisement

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी  हजेरी लावली आहे.  मुंबई शहर आणि उपनगरात (Mumbai Rain Update)  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली होती. शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होत्या.  मात्र शनिवारी पहाटेपासून (Heavy Rain) चांगलाच  जोर धरला आहे.  मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Continues below advertisement

मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड,  कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक दिवासांच्या विश्रांतीनंतर पाऊसाला सुरवात  झाली आहे. या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा उशिराने सुरू आहे. 

रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला 

त्यामुळे शनिवारची सकाळ कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कसरतीची ठरणार, हे स्पष्ट झाले होते. आज सकाळ उजाडल्यानंतरही मुंबई आणि ठाण्यातील पावसाचा (Thane Rain) जोर कायम आहे.  मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.  सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. याशिवाय, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला आहे.

राज्यात पुढील 2-3 दिवस सर्वत्र जोरदार  पावसाचा इशारा

राज्यात पुढील 2-3 दिवस सर्वत्र जोरदार  पावसाचा इशारा दिला आहे.  मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.  विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावासाच्या सरी कोसळल्या आहे. मुंबईसाठी आज आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  सोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तर कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज  आहे.

उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

पुण्यातील घाट परिसरासाठी देखील आॅरेंज अलर्ट जारी  करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.  घाट परिसर सोडता शहरी भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Heavy Rain : राज्यात पुढील 2 - 3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा 

हे ही वाचा :

वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, नदी नाल्यांना पूर, शाळकरी मुलांसह अनेक प्रवासी एसटी बसमध्ये अडकले

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola