Astrology Panchang 24 August 2024 : आज शनिवार, 24 ऑगस्टला चंद्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी रवियोग, वृद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज शनिदेवाच्या आशीर्वादाने सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्ही जवळपास कुठेतरी फिरायला जाऊ शकता. सासरच्या मंडळींशी काही मतभेद चालू असतील तर आज ते दूर होतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आज सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे कामं वेळेवर पूर्ण करता येतील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कर्क राशीचे लोक आज खूप आनंदी असतील आणि तुमची अपूर्ण कामं आज पूर्ण होतील. मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी लागेल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर शनिदेवाच्या कृपेने आज परत मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालवाल.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कन्या राशीचे लोक आज धार्मिक कार्यात काही पैसे खर्च करू शकतात. तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आज तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. तुमचं सरकारी काम अडकलं असेल तर आज ते पूर्ण होईल. नोकरदार लोकांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही घरगुती वस्तू खरेदी करू शकता.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही व्यवसायात काही नवीन प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोक आपलं ऑफिसचं काम मौजमजेने पूर्ण करतील आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही आखतील. लव्ह लाईफमधील गैरसमज दूर होतील.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मीन राशीच्या लोकांना शनिदेवाच्या आशीर्वादाने आज अचानक मोठी रक्कम मिळू शकते. आज तुम्ही जे काम कराल, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Dahi Handi 2024 : 26 की 27 ऑगस्ट? कधी साजरी होणार दहीहंडी? जाणून घ्या अचूक तारीख आणि महत्त्व