ठाणे : कुविख्यात दहशतवादी (Terrorist) म्हणून ओळखला जाणारा साकिब नाचण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पडघा-बोरिवली हे साकिब नाचण याचं मूळगाव आहे. त्यानंतर, बोरिवली आणि पडघा या दोन्ही ठिकाणी 200 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
मुंबई सिरीयल बॉम्ब ब्लास्टमध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता. त्यानंतर ISISI मोड्युलमध्ये डिसेंबर 2023 मध्ये NIA ने पुन्हा त्याला अटक केली होती. दिल्ली येथील तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिथे ब्रेन स्टॉक आल्याने पुढील उपचारसाठी साबिकला दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साकिब नाचन याचा मृतदेह भिवंडी येथील बोरवली गावात आणण्यात येणार आहे, त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.
भिवंडी नाशिक हायवेवर पडघा-बोरिवली गाव हे स्वतंत्र मुस्लिम बहुल राष्ट्र घोषित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छाप्यातून समोर आला आहे. या गावाला सीरियासारख्या भूमीत रूपांतरित करण्याची योजना आखण्यात आल्याचं एनआएचं म्हणणं आहे आणि ही देशविघातक कृत्य कुठे सुरु आहे, तर भारताची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या वेशीवर, अवघ्या 50 किमी अंतरावर. महाराष्ट्र आयसीसच्या दहशतवादी मॉड्यूलवर छाप्यादरम्यान एनआयएनं मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुक, धारदार शस्त्रे, गुन्ह्याची कागदपत्रं, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यातलचं एक मुख्य नाव म्हणजे साकीब नाचन. जो गेल्यावेळी यंत्रणांच्या हाती लागला नव्हता. साकीब स्वत:ला खलिफा म्हणजेच अल्लाहाचा उत्तराधिकारी समजत होता. त्याने पद्धतशीरपणे इसिसशी संबंधित एक-एक गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून करायला सुरुवात केली होती.
मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग
मुंबईतल्या तीन बाँबस्फोटांप्रकरणी 2002-2003 दरम्यान मध्ये साकिबचं नाव चर्चेत आलं. 1990 पासूनच साकीब तपासयंत्रणांच्या रडारवर होता, त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान 11 खटले चालले आहेत आणि साधारण 15 वर्ष तो तुरुंगातही जाऊन आला आहे. एकेकाळी ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं होतं. 3 ऑगस्ट 2012 रोजी भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे मनोज रायचा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, त्यातही साकीब आरोपी होता, याशिवाय गोरक्षकांचे वकिल ललित जैन यांची 2002 साली हत्या करण्यात आली होती, त्यातही तो आरोपी होता.