एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी सुखद बातमी! तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पहाटेपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे काल बंद असलेली तिन्ही मार्गावरील लोकलसेवा आता सुरु झाली आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पहाटेपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे काल बंद असलेली तिन्ही मार्गावरील लोकलसेवा आता सुरु झाली आहे. रेल्वेसेवा सुरु झाल्याने रात्री वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर अडकलेले प्रवासी घराकडे रवाना झाले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर पहाटे 3.17 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली लोकल अंबरनाथच्या दिशेने रवाना करण्यात आली. त्यानंतर ठरावीक अंतराने कल्याण, कसारा, बदलापूर आणि कर्जतकरिता लोकल रवाना करण्यात आल्या. मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेसेवादेखील सुरु झाली आहे. सकाळी 5.22 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेना जाणारी लोकल रवाना झाली. त्यापाठोपाठ पनवेलहून सीएसएमटीसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा नेहमीच्या वेळेनुसार सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवाही सुरु झाली आहे. सकाळी 7.15 वाजता पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. विरार-डहाणूदरम्यानची लोकलसेवा अद्याप बंद असून लवकरात लवकर यादरम्यानची लोकलसेवा सुरु करण्याचा पश्चिम रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ठाण्यासह कोकणातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आपआपल्या जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती पाहून शाळांच्या सुटीबाबतचा निर्णय घ्यावा, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget