Mumbai Rains Local Train मुंबई: मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी (Mumbai Rain) कोसळताना पाहायला मिळत आहेत. पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू असून बाकी ठिकाणी रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू असल्याचा चित्र पाहायला मिळतंय. पहाटेच्या वेळी सखल भागामध्ये पाणी साचल्याचे चित्र होतं. मात्र सध्या पावसाचा जोर अधूनमधून कमी होत असल्याने सखल भागातील पाण्याचा निचरा होत आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाचा फटका लोकलला (Mumbai Local Train Updates) देखील बसला आहे. 

Continues below advertisement


25/08/2025 सकाळी 9.30 वाजतापर्यंतचे अपडेट्स-


पश्चिम रेल्वे (Western Railway Updates)- पश्चिम रेल्वे सध्या 10 मिनिटं उशिराने सुरु आहे. 


मध्य रेल्वे (Central Railway Updates)- मध्य रेल्वे देखील उशिराने सुरु आहे. जवळपास 15-20 मिनिटं लोकल उशिराने धावत आहे.


हार्बर रेल्वे (Harbour Railway Updates)- हार्बर रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. यामुळे पनवेल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. 


पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी-


पश्चिम उपनगरात अधू मधून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग वर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रुझ, विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव दरम्यान मोठे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गोरेगाव ते सांताक्रुझ अर्धा तासाच्या प्रवास मात्र वाहन चालकांना एक ते दीड तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे.खरंतर आठवड्याचा पहिला दिवस आहे मोठा संख्या मध्ये चाकरमानी कामासाठी निघाले आहेत. मात्र या वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरी बाजू या वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर केली जात आहे.


राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार- (Rains will increase again across the Maharashtra)


राज्यभरात पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. मुंबईत आज सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात देखील उद्यापासून काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मागील 4 दिवस पावसाने मुंबईत विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर दिसत आहे. 


मुंबईतील पावसाची आकडेवारी-


कल्याण तहसील पाऊस- 18 mm
भिवंडी तहसील पाऊस - 17  mm
शहापूर तहसील पाऊस - 13 mm
ठाणे तहसील पाऊस - 22 mm
अंबरनाथ तहसील पाऊस- 7 mm 
मुरबाड तहसील पाऊस- 26  mm
उल्हासनगर तहसील पाऊस - 2 mm




संबंधित बातमी:


Rain Update: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात; बाप्पाच्या आगमनाआधी वाढणार जोर, वाचा हवामान विभागाचा अंदाज