Mumbai Nalasopara Crime news  : नालासोपाऱ्यात (Nalasopara) IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून 16 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल दुबे असे वासनांध शिक्षकांचे नाव असून, नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमधील शिक्षक आहे.

पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला दिला बेदम चोप

शिक्षकांचे गैरवर्तन पीडित विधार्थिनींने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आज पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन त्या शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. पीडित  विधार्थिनींच्या तक्रारींवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Akola News: पोलिस अधिकाऱ्याचं दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याशी गैरवर्तन; शिवीगाळ अन् कारवाईची धमकी देत असल्याचा VIDEO व्हायरल