एक्स्प्लोर

आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार: हवामान विभाग

या आठवड्याच्या सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे,  मुलुंड, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पाऊस इतका जोरदार बरसतोय, की दृश्यमानता कमी होत असल्यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावलेला आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. सोमवारी पावसाने सुरु केलेली बॅटिंग सुरुच आहे. हवामान खात्याचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून या आठवड्यात सक्रीय राहणार असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनची स्थिती काय आहे? गेल्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकण गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची विभागवार आकडेवारी कोकण विभागात सरासरी ८१८.९ मिमी पाऊस होतो. तिथे १०७३.७ मिमी म्हणजे सरासरीच्या ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी १६७.८ मिमी पाऊस पडतो. तिथे सरासरी इतकाच म्हणजे १६७ मिमी पाऊस झाला. मराठावाड्यात सरासरी १५९.१ मिमी पाऊस होतो. तिथे १९१ मिमी म्हणजेच २० टक्के जास्त पाऊस झाला. तर विदर्भात सरासरी १९५.३ मिमी पाऊस होतो. तिथे २१३.४ मिमी म्हणजेच ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. संपूर्ण राज्यात सरासरी २३६.१ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा २७४.९ मिमी म्हणजेच सरासरीच्या ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget