एक्स्प्लोर

Mumbai Rain : पहिल्याच पावसात लोकलचा खोळंबा, ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प 

पहिल्याच पावसामुळे ठाणे तेर वाशी ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प झाला आहे. राज्यातल्या विविध भागातही पावसाने हजेरी लावली.

मुंबई: मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात लोकलचा खोळंबा झाला असून ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प झाला आहे. तसेच घाटकोपर स्थानकातही काही वेळेसाठी लोकल ठप्प झाल्याचं चित्र आहे. 

वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने संध्याकाळी 7.15 पासून ठाणे वाशी मार्ग बंद आहे. मात्र ठाणे पनवेल, ठाणे नेरूळ, मार्ग सुरू आहे. ज्यांना वाशीला जायचे आहे त्यांना जुई नगरला उतरून जावे लागणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर देखील घाटकोपर स्थानकात ठाणे लोकल ठप्प झाली आहे. पाऊस सुरू असल्याने ओव्हर हेड वायर आणि पेंटाग्राफ मध्ये होत आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाच्या सरी
कल्याण डोंबिवलीकरांना असलेली पावसाची प्रतीक्षा आज अखेर संपली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात पावसने हजेरी लावली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने घरी परतणाऱ्या, खरेदीनिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पावसाला सुरूवात होताच दुकानदारानी देखील छत्री, रेनकोट  दुकानाबाहेर विक्रीसाठी काढल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना या पावसामुळे मात्र दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता.

अंबरनाथ शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
अंबरनाथ शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे पाऊस पडणार असं वाटत असताना आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला.  हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह पडत होता. पावसामुळे शहरात वीज गायब झाली होती, त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. 

नाशिकमध्ये पाऊस सुरू
नाशिक शहरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. नाशिक शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. मात्र त्यानंतर 6 वाजेपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना यामुळे थोडा का होईना पण दिलासा मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

Embed widget