एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकलच्या रेल्वे रुळाला तडे की रुळ कापून नेला?
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं. पण रुळाचे फोटो पाहिल्यानंतर रुळाला तडे गेले की रुळ कापून नेला, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दादर-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामावरुन परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड झाले होते.
परंतु एबीपी माझाच्या हाती लागलेले फोटो नीट पाहिले तर असंच दिसतंय की, रेल्वे रुळाचा काही इंचाचा तुकडा कापून नेला आहे.
रेल्वे ट्रॅक दुरुस्त, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
रेल्वे रुळाला तडे गेल्याचं ज्या मोटरमनच्या लक्षात आलं, त्याच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. रेल्वेचा आवाज वेगळा आल्याने संबंधित मोटरमनने याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे मोठा अपघात टळला. मात्र यामागे घातपातचा संशयही व्यक्त केला जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement