एक्स्प्लोर

Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती

Mumbai Pune Missing Link Raod: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक आजपासून सुरु झाला आहे.

Mumbai Pune Missing Link Raod: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक (Mumbai Pune Missing Link Raod) आजपासून सुरु झाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. (Mumbai Pune Missing Link)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. (Mumbai Pune Missing Link Raod)
Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती

महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट- (Mumbai Pune Missing Link)

10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वेगमर्यादा खालीलप्रमाणे- (Mumbai Pune Missing Link Raod)

  1. हलकी वाहने (Light Vehicles): ताशी 100 किलोमीटर
  2. प्रवासी वाहने/बस (Passenger Vehicles/Buses): ताशी 80 किलोमीटर

पुढील वाहनांना मिसिंल लिंकवर नो एन्ट्री- (Mumbai Pune Missing Link Raod)

आता मिसिंग लिंकवर सर्वच वाहनांना परवानगी नसणार आहे. त्यात ज्वलनशील वाहने, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंक पूर्णपणे बंदी असेल. या वाहनांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा..

नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार- (Mumbai Pune Missing Link)

मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. मिसिंग लिंक जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे. हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली हजार फूट असणार आहे. जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे. यामुळे नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे.
Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती

दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे- (Mumbai Pune Missing Link)

मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे. यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे. जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे.
Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती

मिसिंग लिंक प्रकल्पाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद- (Mumbai Pune Missing Link project Guinness World Records)

मिसिंग लिंक हा प्रकल्प केवळ रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे.


Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प? (Mumbai Pune Missing Link)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे.  यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरु, कसा आहे प्रकल्प?, रोडचा फायदा काय?, A टू Z माहिती

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mantralaya Protest : मंत्रालयातील लिपिकांचा वेतनवाढीसाठी 'कामबंद' आंदोलनाचा इशारा; 25 नोव्हेंबरपासून राज्य कारभार ठप्प होणार?
मंत्रालयातील लिपिकांचा वेतनवाढीसाठी 'कामबंद' आंदोलनाचा इशारा; 25 नोव्हेंबरपासून राज्य कारभार ठप्प होणार?
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार

व्हिडीओ

Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget