मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.


कंगना रनौतला याआधी जेव्हा समन्स पाठवण्यात आलं होतं. तेव्हा तिने आपल्या भावाचं लग्न असल्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं होतं. पेशाने वकील आणि तक्रारदार महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी गेल्या महिन्यात मुंबई वांद्रे कोर्टात रंगोली आमि कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी सेक्शन 121, 121A, 124A,153A ,153B, 295A, 298 आणि 505 अंतर्गत कंगनाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.


दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण करण्याचा कंगनाचा प्रयत्न


महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद नावाच्या एका व्यक्तीने कंगना विरोधात मुंबई वांद्रे कोर्टात गेले होते. या व्यक्तीने असा दावा केला होता की, कंगना रनौत आपल्या ट्वीट आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या व्यक्तीचं म्हणणं आहे की, कंगना धार्मिक तेढ निर्माण करत असून हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या व्यक्तीनं केली होती. त्यासाठी त्यांनी कोर्टासमोर तिचे व्हिडीओ, ट्वीट्स सादर केले होते. यासर्व गोष्टींची शहानिशा करून कोर्टानं मुंबई पोलिसांना कंगनावर एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.


यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी एबीपी माझाने बातचित केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, याप्रकरणी कोर्टानेच आदेश दिले असल्यामुळे मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करून घ्यावा लागले.' म्हणजेच, कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी पुढिल कारवाईला सुरुवात केली आहे.


कंगनावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगना रनौतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने कलम 156 (3) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर कंगनाची चौकशी होणार आणि जर कंगना विरोधात पुरावे मिळाले तर मात्र कंगनाला अटकही केली जाण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश