मुंबई : कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजर वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. परिणामी लोकांनी मोठ्या प्रमाणात या वस्तू खरेदी केल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकजण या साठेबाजार करताना आढळत आहेत. मात्र, मास्क आणि सॅनिटायजरचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आल्याने पोलीस आता अशा लोकांवर कडक कारवाई करत आहे. या पार्श्वभूमीवर मास्कचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांची बेड्या ठोकल्या आहेत.


कोरोनाने सध्या जगात थैमान घातलं आहे.. या व्हायरसवर अद्याप उपचार सापडलेला नाही आणि यापासून वाचण्याचा एकच पर्याय आहे म्हणजे स्वछता. हात स्वच्छ ठेवणे आणि चेहऱ्यावर मास्क लावावे ज्यामुळे या वायरसपासून आपला बचाव केला जाऊ शकतो. कारण हा व्हायरस संसर्गजन्य आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस पसरत आहे. ज्या दिवसापासून या वायरसने थैमान सुरू केलं तेव्हापासूनच फेस मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या वस्तू केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट करून घेतल्या आहेत. याचा फायदा घेण्यासाठी काही समाजकंटक सज्ज झाले आहेत.

Coronavirus | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 122 वर, आज मुंबईत दहा तर सांगलीत पाच नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

काळाबाजार करण्यांवर पोलिसांची नजर
हॅन्ड सनराईजर आणि मास्क यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांनी अंधेरी भागात असलेल्या "शहा वेअर हाऊस अँड ट्रान्सपोर्ट" यांच्या गोडाउनमध्ये धाड टाकत एक कोटी रुपयांचे चार लाख मास्क जप्त केले. यावेळी पाच जणांना अटकही केलं आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 15 कोटींचा मास्कचा साठा जप्त करत चौघांना अटक केली होती. या मास्कचा साठा करून जास्त पैशाने विकण्याचं काम या टोळीमार्फत करण्यात येणार होतं. ते मुंबई पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे उद्ध्वस्त झाल. जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा होणार नाही, असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीरी लोक वस्तूंचा साठा करताना दिसत आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आडका वाढला
राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.